अजय देवगण च्या मुलीने केले पालकांबद्दल अनेक खु-लासे, सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर

अजय देवगण च्या मुलीने केले पालकांबद्दल अनेक खु-लासे, सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर

बॉलिवूड मध्ये सिताऱ्यांच्या मुलांकडे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव सगळ्यांचेच लक्ष वेधले जाते.अशीच काहीशी दशा ही काजोल आणि अजय देवगण ची मुलगी न्यासा देवगण हीची आहे. न्यासाचे फोटोज आणि व्हिडिओज हे अनेक वेळा व्हायरल होत असतात. खूप वेळा त्यांच्या दिसण्याबाबत व कपड्याबाबत त्यांना ट्रोल केले जाते. हल्लीच तिच्या आईने इन्स्टाग्राम वर ‘ क्वारंटाईन टिप्स ‘ हे शीर्षक देऊन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये न्यासा लोकांमध्ये तिला मिळालेल्या लक्षाबद्दल आणि आई वडिलांकडून मिळालेल्या शिकवणी बाबत ती सांगत आहे.या व्हिडिओ मध्ये त्यांच्या कुटुंबाचे काही खास क्षण आहेत. यासोबत व्हिडिओ मध्ये न्यासा आणि काजोल चा व्हॉईसओव्हर देखील आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित बऱ्याच गोष्टींचा खुलास केला आहे. व्हिडिओची सुरुवात ही न्यासा च्या आवाजाने होते. ती म्हणते की – ” वास्तविक न्यासा कोण आहे, मी तिचा अजूनही शोध घेत आहे. खरं तर तुम्ही जेव्हा या वयात असता तर रोज तुम्ही स्वतःबद्दल नवीन गोष्ट जाणून घेतात.आ-त्मपरीक्षण करणे हा तारुण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही नेहमी स्वतः ला चांगले बनवत असता.लोकांमध्ये मिळणाऱ्या लक्षाबद्दल न्यासा सांगते की – ” मी लक्ष वेधून मोठी झाली आहे, तरीही माझ्या पालकांनी मला गोष्टीची जाणीव होऊ दिली नाही. मोठी होत असताना मला गोष्ट समजली नाही की लोकांना का माहित असते की ती कोण आहे ? “वडिलांकडून मिळालेल्या शिकवणी बद्दल ती बोलते की – ” माझ्या वडिलांनी मला एक सल्ला दिला की माझे मौन च मला संतुष्ट बनवते. त्यांनी मला नेहमी विश्वास दिला की जर तुम्ही परिश्रम करत असाल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. मला नेहमी वाटते की मी जे काही करते, त्याचा परिणाम माझ्या पालकांवर होतो. माझा तिर-स्कार करणारे जेवढे पण लोक आहेत, त्यांनी हे ऐकले पाहिजे की बरेच लोक असे आहेत की जे माझ्याबद्दल चांगल्या आणि गोड गोष्टी बोलतात. मला तेव्हा पण वाटते की मी या सर्वासाठी योग्य नाही आहे.काजोलबद्दल न्यासा सांगते – ” मी आणि माझी आई आम्ही एकसारख्याच आहोत. जरी ती जास्त ओरडत असेल, परंतु ही गोष्ट स्वीकारत नाही. मला माहित आहे की आम्ही दोघीही खूप गोड आहोत आणि आमच्या दोघींकडे कोणतेच फिल्टर नाही आहे.त्याच बरोबर, काजोल सुद्धा न्यासा बद्दल बोलताना सांगते की – ” न्यासा सोबत माझी सुरुवात ही एका लक्ष वेधून घेणाऱ्या आई पासून झाली होती. आम्ही दोघी एकमेकींवर ओरडत असायचो. पण आमचं नात एकमेकींसोबत खूपच सोयीस्कर झाल आहे.

admin