अमिताभ बच्चन नंतर आता या प्रसिध्द अभिनेत्रीला झाली करोनाची लागण

अमिताभ बच्चन नंतर आता या प्रसिध्द अभिनेत्रीला झाली करोनाची लागण

संपूर्ण देशात कोरोना व्हायरस हा वेगाने पसरत आहे. या विषाणूच्या चक्रात बॉलिवूड ते दूरदर्शन वरील कलाकार आले आहेत. आता बातमी येत आहे की दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री ऐश्वर्या अर्जुन यांनाही कोविड – 19 ची लागण झाली आहे. याची माहिती स्वतः त्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली होती.

ऐश्वर्या अर्जुन ने तीच्या इंस्टाग्राम स्टोरी वर एक पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले आहे की, अलीकडेच मला कोविड – 19 ची लागण झाल्याचे आढळले आहे. एका व्यावसायिक वैद्यकीय पथकाद्वारे सर्व आवश्यक खबरदारी घेऊन मी घरीच वेगळी ( क्वारंटीन ) झाली आहे.

मागच्या काही काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील, त्यांनी कृपया स्वतः ची काळजी घ्यावी. सर्वांनी सुरक्षित रहावे व मुखवटा (मास्क ) वापरावा. मी लवकरच माझ्या चांगल्या आरोग्याबद्दल माहिती देईल.

यापूर्वी कन्नड अभिनेता ध्रुव सर्जा आणि त्यांची पत्नी प्रेरणा शंकर सुद्धा कोरोना पाॅझिटीव्ह असल्याचे दिसून आले होते. याची माहिती स्वतः अभिनेत्याने सोशल मीडियावर दिली होती. दोघेही सध्या बंगळुरूच्या एका दवाखान्यात दाखल आहेत.

तसेच, मागच्याच काही दिवसात महानायक अमिताभ बच्चन यांनी सुद्धा या गोष्टीची माहिती दिली होती की त्यांची कोरोना ची चाचणी सुद्धा पाॅझिटीव्ह आली आहे. त्यांच्याबरोबरच अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि त्यांची मुलीला सुद्धा कोरोना झाला आहे. याशिवाय प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांच्या गार्ड ला सुद्धा कोरोना झाला आहे.

तसेच अनुपम खेर यांनी सुद्धा सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यात त्यांनी सांगितले होते की त्यांची आई, भाऊ, मेहुणी आणि भाची सुद्धा कोरोना पाॅझिटीव्ह असल्याचे आढळले आहे. सध्या त्यांची आई ठीक आहे.

छोट्या पडद्यावर एकता कपूरची मालिका कसौटी जिंदगी की 2 मध्ये अनुराग बासू ची भूमिका साकारणारा अभिनेता पार्थ समथान सुद्धा कोरोना पाॅझिटीव्ह असल्याचे दिसले गेले होते. याची माहिती स्वतः पार्थ ने सोशल मीडियावर दिली होती.

admin