‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ फेम अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा; जोडीचा फोटो व्हायरल

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ फेम अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा; जोडीचा फोटो व्हायरल

सध्या मराठी चित्रपट सृष्टी व मालिका विश्वामध्ये अनेक कलाकार हे लग्न उरकून घेत आहेत. अनेक कलाकारांची सध्या लग्न झालेले पाहायला मिळत आहेत. आता देखील एक अभिनेता लवकरच लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे. हा अभिनेता बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये काम करत होता. आम्ही आपल्याला याबद्दलच माहिती सांगणार आहोत.

बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजली. या मालिकेत बाळूमामाच्या भूमिकेत असलेला अभिनेता देखील प्रेक्षकांना खूप भावला होता. ही भूमिका अभिनेता सुमित पुसावळे याने साकारली होती. सुमित पुसावळे या याच्याकडे आणखी काही मालिका असल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना अनेक अभिनेते दिसतात.

सोशल मीडियावर संवाद साधणे, आपल्या चाहत्यांशी संपर्कात राहता येते, असेही अभिनेता व अभिनेत्रीला वाटत असते. तसेच सोशल मीडियावर तुमचे जेवढे मोठे फॅन फॉलॉवर असतात, तेवढेच तुम्हाला सोशल मीडिया हा पैसे देत असतो. सुमित पुसावळे याने काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी चाहत्यांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले होते.

एकाने सुमित पुसावळेला विचारले की, मराठी बिग बॉस मध्ये तुला काम करायला आवडेल का? त्यावर त्याने काहीही न बोलता केवळ चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह निर्माण करून फोटो शेअर केला आहे. त्यानंतर एक चहात्याने विचारले आहे की, तुझे आवडते गायक कोण आहेत? त्यावर सुमित पुसावळे म्हणाला की, माझे आवडते गायक सोनू निगम, मोहम्मद रफी, अभिजीत भट्टाचार्य, कैलाश खेर, अर्जित सिंह हे आहेत, असेही त्याने सांगितले होते. त्याच्या या उत्तरावर त्याची चाहते देखील खूप खुश झाले होते.

बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेत काम करणारा सुमित आता लवकरच लग्न करणार असल्याची बातमी त्याने स्वतः सोशल मीडियावरून आपल्या चहात्यांना सांगितली आहे. काही दिवसापूर्वी त्याने आपल्या प्रेयसीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता आणि आपल्या नात्याची कबुली दिली होती. आता ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मधला सुमित लवकरच लग्न करणार आहे.

admin