गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ब्रीच कॅंडी रुग्णालयात दुःखद निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ब्रीच कॅंडी रुग्णालयात दुःखद निधन, वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!!

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती शनिवारी पुन्हा खालावल्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. लतादीदींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले होते परुंतु या संघर्षाला अपयश आले. 6 फेब्रुवारी सकाळी ब्रीच कॅंडी लता दीदी यांचे दुःखद निधन झाले आहे.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाचा संसर्ग झाल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांना न्यूमोनियाही झाला होता. गेल्या आठवडय़ात त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. त्यांनी अन्नग्रहणही सुरू केले होते. त्यामुळे काही दिवसांत त्या घरी परततील, असे वाटत होते.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लतादीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र शनिवारी पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्यावर पुन्हा अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले होते. त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते असे डॉ. समदानी यांनी सांगितले.

आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील आज सकाळी ९ वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही शनिवारी लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती.दरम्यान,मा. संजय राऊत यांनी ट्विटर वर ‘लता दीदी अमर आहेत’ असा ट्विट केला आहे

लतादीदींच्या प्रकृतीत गुरुवारी, २७ जानेवारीला सुधारणा झाल्याने कृत्रिम श्वसनयंत्रणेचा आधार काढून टाकण्यात होता. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा दहा दिवसांमध्ये त्यांची प्रकृती खालावली. आठ जानेवारीपासून त्या करोना आणि न्युमोनियामुळे रुग्णालयात दाखल आहेत.

admin