‘रंग माझा वेगळा’ मधल्या रेश्मा शिंदे च्या घटस्फोटीत नवऱ्याला पाहिलंत का? आहे हा लोकप्रिय अभिनेता..

‘रंग माझा वेगळा’ मधल्या रेश्मा शिंदे च्या घटस्फोटीत नवऱ्याला पाहिलंत का? आहे हा लोकप्रिय अभिनेता..

गेल्या काही महिन्यापासून रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये वेगळे वळण आल्याचे आपण पाहत आहोत. ही मालिका आता अंतिम टप्प्यात असल्याचे देखील बोलल्या जात आहे. मात्र, ही मालिका काही संपण्याचे नाव घेत नाही, असे देखील काही प्रेक्षक म्हणत आहेत. या मालिकेमध्ये आपल्याला दीपा आणि कार्तिक यांची प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे.

मात्र, दोघांच्या प्रेम कहानी मध्ये अनेकदा वेगवेगळे वळण देखील आल्याचे पाहायला मिळाले. मालिकेमध्ये दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली आहे, तर कार्तिकच्या भूमिकेमध्ये आपल्याला आशुतोष गोखले हा अभिनेता दिसला आहे, तर यामध्ये दोन चिमुकल्या मुली देखील दिसल्या आहेत. मालिकेमध्ये आता दिपाच्या मित्राची एन्ट्री झाली आहे.

त्यामुळे कार्तिक हा दीपा कडे पुन्हा एकदा संशयाने पाहत आहे. तिचा मित्र सुजय हा मालिकेत आल्याने वेगवेगळे वाद देखील मालिकेत पुन्हा पाहायला मिळत आहेत. मालिकेमध्ये दीपा अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या आयुष्यात देखील वादळ आलेले आहे. याबद्दलच आपण जाणून घेऊया.. गेल्या काही वर्षांमध्ये मराठी कलाकारांचे घटस्फोट होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

कलाकार हे अल्पावधीतच लग्न आटवून पुन्हा एकदा नवीन आयुष्याला सुरुवात करताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना मानसी नाईक हिने पती प्रदीप खरेरा याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्याने स्वतःहून माहिती देऊन सांगितले होते की, मी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. त्यानंतर या चर्चा थांबल्या होत्या.

सध्या छोट्या पडद्यावर आई कुठे काय करते ही मालिका प्रचंड गाजताना दिसत आहे. आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आपल्याला संजनाची भूमिका देखील दिसत आहे. ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले हिने साकारली आहे. आपल्या अभिनयाने तिने सगळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.. रूपाली भोसलेचे देखील पहिले लग्न झाले होते.

मात्र, पहिल्या पतीला तिने दिले सोडून दिले. तिच्या पहिल्या पतीचे नाव मिलिंद शिंदे असे होते. त्यानंतर ती आता मालिकात काम करू लागली आहे. अनिकेत मगरे याला देखील तिने काही वर्ष डेट केले होते. मात्र त्यांच्यातही पुन्हा बिनसले. आता रंग माझा वेगळामध्ये काम करणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे हिच्या बाबतीत देखील एक बातमी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

ती बातमी म्हणजे रेश्मा शिंदेच्या पहिल्या पतीची आहे. रेश्मा शिंदेचे पहिले लग्न झाले असून तिच्या पतीचे नाव अभिजीत चौगुले असे होते. लग्न झाल्यानंतर काही वर्ष या दोघांचा संसार हा अगदी नेटाने झाला. मात्र, त्यानंतर यांच्यामध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता रेश्मा शिंदे ही पतीपासून वेगळे राहत आहे. तिचे नाव मध्ये एका अभिनेतासोबत जोडल्या गेले होते.

admin