पतीसह माहेरी पोहचली अभिनेत्री कतरिना कैफ, हातात हात घालून…

पतीसह माहेरी पोहचली अभिनेत्री कतरिना कैफ, हातात हात घालून…

कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न झाल्यापासून चाहते त्यांच्या सोशल मीडिया पोस्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. काही काळापूर्वी कतरिना आणि विकी या दोघांनीही इन्स्टाग्रामवर त्यांचे काही फोटो शेअर केले होते. आजकाल कतरिना कैफ पती विकी कौशलसोबत तिच्या माहेरी म्हणजेच लंडनला पोहोचली आहे आणि आता तिने तेथील फोटो देखील शेअर केले आहेत. जे पाहून चाहते अतिशय खुश झाले आहेत.

विक्की कौशलने त्याच्या इंस्टाग्रामवर कतरिना कैफसोबत रस्त्याने चालतानाचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यात त्याने ‘शुगर क्रश’ असे कॅप्शन दिले आहे. या फोटोत दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. कतरिना पती विकी कौशलसोबत तिच्या ट्रिपचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे. या फोटोमध्ये कतरिनाने तिच्या आवडत्या डिशचा फोटोही शेअर केला आहे.

लग्नानंतर कतरिना आणि विकी दोघेही प्रत्येक प्रसंगाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. दोघेही एकमेकांसोबत मस्त वेळ घालवत आहेत, तसेच या सुंदर क्षणांचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. अलीकडेच कतरिनाने विकी कौशलसोबतचा एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये दोघे पूलमध्ये एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत होते. या फोटोमध्ये कतरिना पांढऱ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसली होती.

कतरिना कैफने काही दिवसांपूर्वी तिच्या आईचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता ज्यामध्ये तिचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते, या फॅमिली फोटोमध्ये फक्त विकी कौशल दिसत नव्हता. त्यामुळे असे अंदाज बांधता येत की विकी कौशल सासूच्या वाढदिवशी लंडनला पोहचू शकला नाही. व्यस्त वेळापत्रकामुळे तो नंतर पत्नीसह वेळ घालवायला लंडला गेला.

Team Viral Batmya

Leave a Reply

Your email address will not be published.