वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील या चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!!

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील या चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!!

भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना महत्त्व आहे. आपली वास्तू ही आपल्यासाठी सगळं काही असते. आपण ज्या घरात राहतो, ते नीटनेटके ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. कोणत्याही घरातील महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर वा आधुनिक भाषेतील किचन.

दररोज पोटाची खळगी भरण्यापासून ते भांड्याला भांड लागण्यापर्यंत अनेक गोष्टी स्वयंपाकघरात केल्या जातात. घरातील महिला ज्या ठिकाणी सर्वाधिक वेळ घालवतात ते स्वयंपाकघर.

जीभेचे चोचले पुरवण्यासाठी स्वयंपाकघरात वेगवेगळे प्रयोग केले जातात. मात्र, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघराला महत्त्वाचे मानले गेले आहे. अनेक गोष्टी आपण जुनाट म्हणून त्याकडे लक्ष देत नाही.

मात्र, पूर्वजांनी योग्य तर्क, शास्त्र आणि नेमक्या आधारावर त्या सांगितलेल्या असतात. त्यामागे निश्चित काहीतरी कारण असते. कालौघात अशा अनेक गोष्टी मागे पडलेल्या आपण पाहतो.

स्वयंपाकघरात वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य बदल केल्यास वास्तुदोष दूर होऊन आपणास धनलाभा होऊ शकतो. घरात सुख, शांतता, उत्तम आरोग्य प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते.

स्वयंपाकघरात आपण करत असलेल्या काही चुकांमुळे वास्तुदोष वाढू शकतो, असे मानले जाते. स्वयंपाकघरातील कोणत्या चुका टाळाव्यात? या चुका सुधारल्यास काय फायदा होऊ शकतो? जाणून घ्या…

स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे स्थान मानले जाते. स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींचे योग्य पालन केल्यास, योग्य स्वच्छता, टापटीपपणा, नीटनेटकेपणा कायम राखल्यास लक्ष्मी मातेची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहूते, असे सांगितले जाते.

अनेक घरातील देवघर स्वयंपाक घरात असते. त्यामुळे आणखीन सावध राहणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. देवघर म्हणजे देवचे स्थान, म्हणून आपले स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असावे.

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात कधीही चप्पल-बूट घालून जाऊ नये. असे केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. याशिवाय कात्री, सुरी यांसारख्या धारदार वस्तू भींतीवर अडकवू नये. असे केल्यास प्रगती मार्ग खुंटतात, अशी मान्यता असल्याचे वास्तुशास्त्र सांगतात.

स्वयंपाकघरातील सर्वांत महत्त्वाच्या पदार्थांमध्ये वरचा क्रमांक लागणारा घटक म्हणजे दूध. दुधाचे फायदे, दुधाचे महत्त्व आपणास वेगळे सांगावयास नको.

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात दूधाचे व्यवस्थापन करताना अतिशय काळजी घेणे महत्त्वाचे असते. स्वयंपाकघरात दूध कधीही खुले ठेवू नये. ते नेहमी झाकलेले असावे.

दुधाच पातेल, दूध असलेले भांडे नेहमी झाकून ठेवावे. असे न केल्यास समस्या, अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते. त्यात वाढ होऊ शकते. आर्थिक, शारीरिक, मानसिक समस्या, अडचणी उद्भवू शकतात, असे सांगितले जाते.

याचे दुसरे व्यवहारिक कारण म्हणजे दूध हे जितके सक्षम, सकस आहे, तितकेच ते संवेदनशील आहे. दुधात एखादी गोष्ट पडून आपल्या पोटात गेल्यास आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.

वास्तुशास्त्राप्रमाणे स्वयंपाक घरात मेज (डायनिंग टेबल) असल्यास त्याची दिशा उत्तरपूर्व असावी. यामुळे घरातील माणसांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

असे सांगितले जाते की, किचन आणि शौचालयांची भिंत एक नसावी. तसेच दुमजली घरांमध्ये किचनच्या वर शौचालय नसावे. याने संकटे वाढू शकतात.

तसेच घरात मुख्य प्रवेशद्वारासमोर किचनची खोली नसावी, असेही सांगितले जाते. वास्तुशास्त्राप्रमाणे किचनची खिडकी ही उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेल असायला हवी.

स्वयंपाक घरातील खिडकी बहुतांश वेळ उघडीच असावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. घरातील सदस्यांमधील आपलेपणा वाढतो. नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते, असे सांगितले जाते.

Team Viral Batmya