या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री आहेत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सासूबाई

या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री आहेत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सासूबाई

आपल्या विनोदी टाइमिंगने सगळ्यांनाच हसवणारे जेष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आजही आपल्या मध्येच आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून ते आपल्याला भेटत असतात. त्यांच्या अफलातून अभिनयाने त्यांनी सगळ्यांच मनोरंजन केले.

लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी अशोक सराफ, महेश कोठारे यांच्यासोबत विशेष करून गाजली होती. त्याचबरोबर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया बेर्डे यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले. कालांतराने त्यांनी लग्न देखील केले. आता लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मुलं देखील चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असल्याचे पाहायला मिळते.

त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे यांनी काही चित्रपटात काम केले आहे, तर मुलगी देखील चित्रपटात काम करत आहे. पत्नी देखील चित्रपटात अनेक वर्षापासून काम करते. त्यांच्या पत्नीचे नाव प्रिया बेर्डे आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सासूबाई देखील चित्रपटात काम करतात. आजही त्या मालिका विश्वामध्ये आपल्याला दिसत असतात. त्यांच्याबद्दलच आम्ही आपल्याला या लेखामध्ये सांगणार आहोत.

अलीकडे दार उघड बये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेमध्ये वेगवेगळ्या भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मालिकेमध्ये मुक्ताची भूमिका अतिशय जबरदस्त रित्या झाली आहे. मुक्ताही समाजाच्या विरोधात जाऊन हातामध्ये संबळ घेऊन मंदिरात वाजवते आणि पुरुषांची मक्तेदारी मोडीस काढते, असे या मालिकेचे चित्रीकरण दाखल झाले आहे.

तर या मालिकेमध्ये अतिशय वेगळी वळण आता पाहायला मिळणार आहे. या मालिकेमध्ये काम करणारी एक अभिनेत्री दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची सासू आहे. याबद्दलच आम्ही आपल्याला माहिती सांगणार आहोत. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक मालिका, चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाचा डंका वाजवला. त्याचप्रमाणे त्यांची पत्नी आणि मुले ही आता अभिनय करतात.

त्यांची सासू देखील अभिनय क्षेत्रात होती. दार उघड ब ये या मालिकेमध्ये चंद्रकला आजी यांची भूमिका अतिशय लोकप्रिय होताना दिसत आहे. चंद्रकला आजी यांची भूमिका माया जाधव यांनी साकारली आहे. अभिनय सोबत असताना नृत्य करण्याची आवड देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. लावणी प्रधान चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनेत्रींच्या सोबतसह नायीका म्हणून अनेक चित्रपटात लावणी सादर केल्याचे आपण पाहिले आहे.

अनेकदा माया जाधव या खूप चित्रपटात झळकलेल्या आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे या माया जाधव यांची भाची आहेत. त्यामुळेच माया जाधव या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सासुबाई होतात. प्रिया बेर्डे यांनी नृत्याचे धडे देखील आपल्या मामी माया जाधव यांच्याकडून घेतले आहेत.

admin