लॉकडाऊन च्या काळात 4 दिवसातच या 3 कलाकारांनी दिली सलमान खानच्या फार्म हाऊसला भेट

लॉकडाऊन च्या काळात 4 दिवसातच या 3 कलाकारांनी दिली सलमान खानच्या फार्म हाऊसला भेट

बॉलिवूड मधील दबंग सुपरस्टार सलमान खान यांच्या नवीन गाण्याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट बघत होते. कारण गाण्याचे टीझर हे आधीच प्रदर्शित झाले होते आणि त्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. तेच आता हे संपूर्ण गाण आता काही मिनिटांपूर्वी प्रदर्शित झाल आहे. जे आता इंटरनेट च्या जगात धुमाकूळ घालत आहे.

देशात सर्वत्र लॉकडाऊन घोषणा झाल्यापासून सलमान हे आपल्या कुटुंबासोबत व जवळच्या मित्रांसोबत पनवेल मध्ये असलेल्या फार्महाऊस मध्ये आहेत. त्यांच्यासोबत कुटुंबातील काही सदस्य व चित्रपट सृष्टीतील काही मित्र पण आहेत.

यांमध्ये जॅकलिन फर्नांडिस, वलुशा डिसुझा आणि युलिया वंतुर हे सुद्धा आहेत. सलमानने फार्महाऊसवरून 2 गाणे तयार केले आहेत.’ तेरे बिना ‘ या नवीन गाण्याचे सुद्धा टीझर प्रदर्शित झाले आहे. हे गाणं कसे बनले जाणून घेण्यासाठी तुम्ही विचार करायला भाग पडाल.

सुपरस्टार सलमान खान हे मुंबईमधील पनवेल मधल्या त्यांच्या फार्महाऊस मध्ये आहेत. या दरम्यान, ते काही ना काही नवनवीन गोष्टी करत आहेत आणि याच भागात त्यांच नवीन गाण ‘ तेरे बिना ‘ हे प्रदर्शित झाल आहे. लोकांना जॅकलिन फर्नांडिस आणि सलमान खान यांचा रोमँटिक अंदाज खूप आवडत आहे.

सलमान खान ने आपल्या सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंट वर आणि ट्विटर वर गाणं प्रदर्शित करण्याची माहिती दिली होती. ज्यासोबत त्यांनी गाण्याची यूट्यूब लिंक सुद्धा दिली होती. या रोमँटिक प्रेमळ गाण्यामध्ये सलमान सोबत जॅकलिन सुद्धा दिसत आहे. लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करून कमीत कमी संसाधनात हे गाणं तयार केलं गेलं आहे.

व्हिडियोशी काही माहिती सलमान खान सोबत त्यांच्या फार्महाऊसवर असणाऱ्या वलुशा डिसुझा ने आपल्या पोस्ट वर शेअर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गॅलेक्सी अपार्टमेंट च्या बिल्डिंग मध्ये राहणारे सलमानचे मित्र अजय भाटिया यांनी ‘ तेरे बिना ‘ हे गाणं तयार केलं आहे.

याच गाण्यामध्ये सलमान सोबत जॅकलिन सुद्धा दिसत आहे, जॅकलिन च्या म्हणण्यानुसार, चित्रीकरणाच्या वेळी त्यांना सर्वात जास्त त्रास हा मेकअप साठी झाला आहे. कारण त्यांच्याकडे मेकअप साठी सुद्धा संघ नव्हता. सर्व काही स्वतः लाच करावे लागले.

मीडियाच्या माहितीनुसार, ‘ तेरे बिना ‘ या गाण्याचे चित्रीकरण सलमान व जॅकलीन सोबत अन्य तीन लोकांनी मिळून केले. तेच सलमान खान यांनी सांगितले की हे त्यांचे सर्वात स्वस्त उत्पादन आहे. त्यांना खात्री पटत नव्हती की एवढे स्वस्त उत्पादन सुद्धा होऊ शकते.

चित्रीकरणाच्या अगोदरच सर्व काही ठरले होते की फार्महाऊस मधील कोणते कोणते भाग हे चित्रीकरणात घेतले जातील. सलमान खानच्या म्हणण्यानुसार, फार्महाऊस जास्त दाखवले नाही आहे कारण हे त्यांचे घर आहे. त्या लोकांनी आधीच ठरवले होते की कोणता कोणता भाग हा चित्रीकरणात घ्यायचा आहे.

एवढेच नाही तर चित्रीकरणाच्या दरम्यान काही किरकोळ अडचणी सुद्धा आल्या, कारण संघ खूप छोटा होता आणि जबाबदारी मोठी होती. अशा परिस्थितीत सरकारच्या नियमांचे पालन करणे सुद्धा महत्त्वाचे होते. ज्याची सलमानच्या संघाने पूर्णपणे काळजी घेतली.

सलमान सांगतात की इंटरनेट हे खूप हळू होते, वाय – फाय सुद्धा चालत नव्हते. हे करण्यास 24 तास लागले होते. या आधी सलमानच ‘ प्यार कोरोना ‘ हे गाणं सुद्धा प्रदर्शित झाल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गाण्यांना सलमानने स्वतः आवाज दिला आहे.

सलमान खानच्या नवीन गाण्याचे चित्रीकरण हे पनवेल येथील फार्महाऊस मध्ये शासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करून चित्रित करण्यात आले. व्हिडिओमध्ये हे दाखवले आहे की सलमान यांना कोणते पण हिट गाणे तयार करायला फॅन्सी उपकरणांची किंवा जागेची आवश्यकता नसते. या गाण्याला स्वतः सलमान यांनी आवाज दिला आहे आणि याचे दिग्दर्शन सुद्धा त्यांनीच केले आहे.

व्हिडिओ ला इंस्टाग्राम वर पोस्ट करताना अभिनेत्याने लिहिले की, ” मी हे गाणे तयार केले, गायले, चित्रित केले आणि पोस्ट केले तुमच्यासाठी, आता तुम्ही सुद्धा हे गाणे ऐका, गा आणि तुमच्या अंदाजात घराघरात चित्रित करा, पोस्ट करा, टॅग करा आणि मजा करा. ”

गाण्याच्या व्हिडिओला सलमानच्या फार्महाऊस वर चित्रित करण्यात आले होते ज्यामध्ये आसपासचे सुंदर दृश्य टिपले आहे. सलमान खान दिग्दर्शित ‘ तेरे बिना ‘ गाणं हे त्यांच्या आवाजात केलेले त्यांचे मित्र अजय भाटिया यांनी ते संगीतबद्ध केले असून शब्बीर अहमद यांनी ते लिहिले आहे.

हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर लगेच जवळपास 2 लाख वेळा बघितले गेले आहे. तो व्हिडिओ बघून असे वाटते की या गाण्याला बघून सल्लू मीया च्या चाहत्यांना या लॉकडाऊन मध्ये शांतता मिळाली.

admin