कॅटरिनाच्या बाबतीत सलमानने पहिल्यांदाच उघडले हे रहस्य, म्हणाला,”मी कॅटरिनाचा प्रत्येक….

कॅटरिनाच्या बाबतीत सलमानने पहिल्यांदाच उघडले हे रहस्य, म्हणाला,”मी कॅटरिनाचा प्रत्येक….

चित्रपटसृष्टीत सलमानचे नाव हे सर्वांनाच माहित आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का सलमान खानचे कॅटरिनासोबत जेवढे नाते पडद्यावर चांगले आहे तेवढेच पडद्याच्या बाहेर सुद्धा चांगले आहे.

तथापि, दोघांची केमिस्ट्री बघून अनेक वेळा अशा गोष्टी समोर येत होत्या की दोघांमध्ये अफेयर चालू आहे. परंतु अजून पर्यंत या दोघांतून कोणी सुद्धा या गोष्टीवर मोहर लावली नाही.

आज पुन्हा या दोघांवर चर्चा होत आहे, असे यामुळे की दोघे चांगले मित्र आहेत, अनेक कार्यक्रमात आणि पुरस्कार सोहळ्यात दोघे एकत्र दिसले जातात आणि हल्लीच त्यांना एकत्र बघितले गेले आहे. खरतर हल्लीच सलमान खानने कॅटरिना कैफ वर भाष्य करताना त्यांच्याशी संबंधीत एक गुपित सुद्धा सांगितले. मग काय तर पुन्हा हे दोघे चर्चेत आले.

आपल्या सर्वांना माहीतच आहे की सलमान खान मुंबई पोलिस साठी आयोजित केलेल्या कार्यक्रम उमंग मध्ये भाग घेण्यास गेले होते, जिथे त्यांनी आपला चित्रपट ‘ दबंग 3 ‘ च्या ‘ मुन्ना बदनाम ‘ या गाण्यावर नृत्य केले. परंतु यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा हे मंचावर पोहचले आणि सलमान खान सोबत बोलायला गेले.

या दरम्यान कपिल शर्मा यांनी सलमान खान ला विचारले की खूप सारे चाहते हे तुम्हाला संदेश पाठवत असतात तर अशामध्ये तुम्ही कधी एखाद्या चाहत्याच्या फोटोला झूम करून बघितले आहे ? तेव्हा सलमानने कपिलच्या प्रश्नाला उत्तर देत सांगितले की कोणत्या चाहत्याचा नाही तर, कॅटरिना चा प्रत्येक फोटोला झूम करून बघतात.

सलमान खानच्या या उत्तरावर प्रत्येक जण हा हसायला लागतो. तथापि, अनेक वेळा सलमान खानने सार्वजनिक मंचावर कॅटरिना कैफ बद्दल टिप्पणी केली आहे.

या वर्षी मुंबई पोलिसांचा वार्षिक कार्यक्रम ‘ उमंग 2020 ‘ मध्ये कलाकारांनी सुद्धा सहभाग घेतला होता. या दरम्यान लोकांनी फक्त विनोदाचेच मजे नाही घेतले तर नृत्याचे देखील मजे घेतले.

admin