आईच्या मृ-त्यूवर रडायच्याऐवजी हे काम करत होता अभिनेता संजय दत्त

आईच्या मृ-त्यूवर रडायच्याऐवजी हे काम करत होता अभिनेता संजय दत्त

संजय दत्त हे 61 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म हा 29 जुलै 1959 ला मुंबई मध्ये झाला होता. अनेक सुपरहिट चित्रपटात काम करणाऱ्या संजय दत्त यांचे आयुष्य हे वादविवादांनी घेरलेले होते. त्यांच्या एकूण 308 प्रियासी होत्या. वैयक्तिक आयुष्याबरोबरच ते न-शेच्या पदार्थांच्या सेवनामुळे सुद्धा चर्चेत आले होते. त्यांच्या जीवनावर आधारित ‘ संजू ‘ चित्रपटात अभिनेत्याच्या आयुष्यातील उतार – चढाव दाखवले आहेत.

लहानपनापासूनच संजयला घरात सर्व सुख सोयी मिळाल्या ज्या फारच कमी लोकांच्या नशिबात असतात. संजय चे आई वडील हे दोघेही चित्रपट सृष्टीत होते. कुटुंबाकडे पैशांची काहीच कमी नव्हती आणि आई – वडील दोघेही आपल्या कामांमध्ये व्यस्त होते.

याच दरम्यान संजय यांनी महाविद्यालयात जायला सुरुवात केली आणि ते वाईट संगतीत पडले आणि त्यांना गां-जा व न-शेच्या पदार्थांच्या सेवनाचे त्यांना व्यसन लागले. संजयला लहानपनापासूनच अभ्यासात काहीच आवडत नव्हती. परंतु, वडिलांच्या सांगण्यावरून ते महाविद्यालयात गेले आणि त्यांनी आपली पदवी पूर्ण केली.

संजयचे वडील सुनील दत्त यांना संजयच्या गां-जा आणि न-शेच्या पदार्थांच्या व्यसनाबद्दल काहीच कल्पना नव्हती, परंतु त्यांची आई नर्गिस यांना जाणीव झाली होती. त्यांना संजय वर तेव्हा संशय आला जेव्हा ते स्वतः ला एका खोलीत बंद करून घेत होते. माहित असूनही याबद्दल कोणतीच माहिती ही संजयच्या वडिलांना दिली नाही. त्यांना असे वाटले की त्या संजय ला त्यांच्या प्रेमाने व मार्गाने वळणावर आणू शकतील. परंतु, असे नाही झाले.

सुनील दत्त यांना जेव्हा या गोष्टीबद्दल समजले की आपला लाडका मुलगा हा गां-जाच्या व्यसनात अडकला आहे तर त्यांना खूप धक्का बसला. त्यांनी संजयला कामात व्यस्त करायला सुरुवात केली. त्यांना वाटले की असे केल्याने संजयचे हे गां-जाचे व्यसन निघून जाईल.

यासाठी त्यांनी संजयला आपल्या कार्यालयात चित्रपटाच्या पदार्पणाबद्दल बोलण्यासाठी बोलावले होते. परंतु तेव्हा पण त्यांना खूप मोठ्या प्रमाणात गां-जा घेतला होता. मुलाला अशा अवस्थेत सुनील दत्त यांनी पहिल्यांदाच बघितले होते.

एकीकडे संजय हे त्यांच्या पदार्पणातील चित्रपटाच्या तयारीत होते तर दुसरीकडे त्यांची आई नर्गिस दत्त यांची तब्येत बिघडली होती. नर्गिस यांना कॅन्सर होता. 1981 मध्ये संजय दत्त च्या पदार्पणातील चित्रपटाची प्रदर्शित होण्याची तारीख 8 मे ही ठरवण्यात आली. त्या दरम्यान नर्गिस यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आले.

जिकडे, सुनील सोबत कुटुंबातील सर्व सदस्य हे नर्गिस यांच्या तब्येतीमुळे चिंतेत होते. तर तिकडे नर्गिस यांना आपल्या मुलाच्या व्यसनाबद्दलची चिंता खात होती. सुनील दत्त यांनी चित्रपटाच्या प्रीमियर साठी घरीच सिनेमाघर बनवले होते.

ज्यामुळे नर्गिस हे आपल्या मुलाचा पदार्पणाचा चित्रपट बघू शकतील. परंतु बघता बघता नर्गिस यांची तब्येत अचानक खूप खराब होऊ लागली आणि त्यांना दुसऱ्या खोलीत आणून झोपू घातले.

संजयच्या आयुष्यातील ती वेळ किती कठीण होती या गोष्टीचा अंदाज असा लावता येईल की नर्गिस यांच्या मृ-त्यूवर रडण्याऐवजी संजय आपली बहीण प्रिया दत्त हिच्या कडून च-रस मागत होते. कारण त्यावेळी संजय यांना व्यसन हे अशा प्रकारे लागले होते की घरी काय चालू आहे हे त्यांना काहीच समजत नव्हते. त्यांची अशी स्थिती पाहून संजय दत्त हे पूर्णपणे तुटले होते.

एकीकडे आपल्या पत्नीच्या जाण्याचे दुःख तर एकीकडे मुलाची अशी अवस्था. सुनील हे जवळपास पूर्णपणे तुटले होते. यानंतर त्यांनी काहीच वेळ न घालवता लगेच परदेशी डॉक्टर्स सोबत बोलणे केले आणि संजयला घेऊन उपचारासाठी आधी जर्मनी ला घेऊन गेले आणि नंतर मग अमेरिकेला.

उपचारानंतर संजय यांना समजले की आपल्या आईचे निधन झाले आहे तेव्हा ते खूप रडले. एवढे रडले की लगातार 4 दिवसांपर्यंत रडतच राहिले. त्यांना विश्वास बसत नव्हता की आता या जगात त्यांची आई नाहीये.

admin