Fir दाखल होताच रिया चक्रवर्ती चा हात जोडलेला व्हिडिओ आला समोर

Fir दाखल होताच रिया चक्रवर्ती चा हात जोडलेला व्हिडिओ आला समोर

सुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंग यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यापासून रिया आजपर्यंत माध्यमांसमोर आलीले नाही. मात्र सुशांतसिंग राजपूत प्रकरणात प्रथमच रिया चक्रवर्ती यांचे विधान समोर आले आहे. रिया चक्रवर्ती यांनी आपल्या निवेदनात न्यायावर विश्वास व्यक्त केला आहे.

खरं तर, नुकतीच रिया चक्रवर्ती यांचा एक व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेद्वारे समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, पांढऱ्या कपड्यांमध्ये रिया चक्रवर्ती यांनी माध्यमांसमोर आपला मुद्दा मांडला आहे. रिया म्हणाली, माझा देव आणि न्यायप्रणालीवर दृढ विश्वास आहे. माझा विश्वास आहे की मला न्याय मिळेल.

त्यानंतर व्हिडिओमध्ये रिया पुढे, ‘माध्यमांमध्ये माझ्याविषयी बरेच काही सांगितले जात आहे, परंतु माझ्या वकिलांच्या म्हणण्यानुसार मी यावर भाष्य करणार नाही. सत्यमेव जयते. सत्य समोर येईल. रियाच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत तसेच काहीजण त्याचे समर्थन करत आहेत तर काही जण त्यास ढोंग म्हणत आहेत.

सुशांतसिंग राजपूतचे वडील केके सिंह यांनी रिया आणि तिच्या कुटूंबावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच सुशांतच्या वडिलांनी रिया व तीच्या कुटुंबातील सदस्यांवरही आरोप केले आहेत. आणि म्हणाले, “जेव्हा रियाला माहित होते माझ्या मुलाची मानसिक स्थिती नाजूक आहे,

तेव्हा अशा परिस्थितीत त्याच्यावर योग्य पद्धतीने उपचार न करणे आणि त्याच्या उपचाराचे सर्व कागदपत्रे तिच्या सोबत घेऊन जाणे आणि तसेच माझ्या मुलाला अशा नाजूक स्थितीमध्ये एकटे सोडणे आणि त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडणे ज्याकारणामुळे माझ्या मुलाने आ-त्मह-त्या केली व त्याच्या मृ-त्यूसाठी जबाबदार रिया व तिचे कुटुंबजन तसेच सहकारी हे आहेत. या गोष्टीची चौकशी करावी. ‘

रिया चक्रवर्ती यांच्यावर पैशांच्या हेराफेरीचा आरोप करत केके सिंग यांनी गुन्ह्यामध्ये लिहिले की, “मला माझ्या मुलाच्या बँक खात्याच्या विधानावरून असे समजले आहे की मागच्या एका वर्षात जवळपास 17 करोड रुपये माझ्या मुलाच्या 10*** या खाते नंबर कोटक महिंद्रा बँकेत होते.

या काळात सुमारे 15 कोटी रुपये काढले गेले.अशा खात्यात पैसे पाठवले गेले आहेत ज्या खात्याशी माझ्या मुलाचा काहीच संबंध नाहीये. माझ्या मुलाच्या सर्व खात्यांची चौकशी करावी की या बँक खाते/ क्रेडिट कार्ड मधून किती पैसे रियाने आपल्या कुटुंबांकडून व सहकाऱ्यांकडून धोक्याने आणि षडयंत्राने लुबाडले आहेत.

admin