होळीच्या रंगात रंगले टीम इंडियाचे स्टार खेळाडूंची, रोहित आणि विराटने लुटली पार्टी…

यावेळी होळीच्या सणामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. देशवासी आपापसात रंगांचा हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. त्याचबरोबर क्रिकेटरसिकांवरही होळीचा रंग चांगलाच रंगत आहे. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये भारतीय खेळाडूंनी परदेशी खेळाडूंसोबत हा सण चुरशीने खेळला. त्याचबरोबर टीम इंडियाच्या खेळाडूंनीही चौथ्या कसोटीपूर्वी होळीचा सण उत्साहात साजरा केला.
भारतीय संघाचा स्टार ओपनिंग बॅट्समन शुभमन गिलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील अनेक स्टार क्रिकेटर्स होळीचा आनंद लुटताना दिसत आहेत. हा व्हिडिओ टीम इंडियाच्या बसचा आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचे खेळाडू होळीच्या गाण्यांवर नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओवर क्रिकेट चाहते अनेक कमेंट करत आहेत.
गिलच्या व्हिडिओमध्ये विराट कोहली हे गाणे गाताना दिसत आहे. त्याचवेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मागून विराट आणि शुभमन गिलवर गुलाल उडवत आहे. याशिवाय श्रेयस अय्यरही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. गिलशिवाय रोहितने सोशल मीडियावर दोन फोटोही शेअर केले आहेत. त्यात मोहम्मद सिराज, चेतेश्वर पुजारा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल हे दिग्गज आहेत.